दलित वस्ती सुधार निधी अखर्चित : वंचितचे आमरण उपोषण

यवतमाळ : यवतमाळ नगर परिषदेने दलित वस्ती सुधार निधीची रक्कम २०१९ पासून अखर्चित ठेवली असून सहा जानेवारी २०२५ रोजी दलित वस्ती निधीचे  २१,१०,५७,१७४ /- (अक्षरी- एकवीस कोटी, दहा लाख, सत्तावन्न हजार,एकशे चौहत्तर रू.) शिल्लक  आहे. नगर परिषदेने दलित सुधार निधीची रक्कम वेळोवेळी मुदती ठेवीत (Fixed Deposit) ठेवून केवळ व्याजापोटी ०१,२७,०६,९६७/_ (एक कोटी,सत्तावीस लाख,सहाहजार,नऊशे सदूसष्ट रू.) ऐवढी  रक्कम व्याजापोटी कमविले आहे. नगरपरिषदेने शासनाच्या निधीचा चक्क व्यवसाय केला असून दलित वस्तीच्या विकास कामाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर परिषद समोर उपोषणास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीने दलित वस्ती सुधार निधीची रक्कम तात्काळ खर्च करण्याबाबत नगरपरिषदेला दिनांक १९ डिसेंबर २४, दि. ०६ मार्च २०२५ आणि दि. १० मार्च २०२५ ला निवेदने देऊन दलित वस्तीचा निधी दलित वस्तीवरच खर्च करावा, अशी वारंवार विनंती केली. परंतु नगर परिषदेने बहुजन समाजाच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून राजकीय दबावापोटी दलित वस्तीचा निधी सुधारित वस्त्यांमध्ये खर्च करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. वरील अन्यायाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने डाॅ. नीरज वाघमारे, जिल्हाध्यक्ष यवतमाळ यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी- यवतमाळ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यवतमाळ, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका विभाग यवतमाळ, तसेच मुख्याधिकारी नगरपरिषद यवतमाळ यांना निवेदन देऊन   आज दिनांक १७ मार्च २०२५ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणास डॉ. नीरज वाघमारे जिल्हाध्यक्ष-वंचित बहुजन आघाडी, शिवदास कांबळे- जिल्हा महासचिव, गजानन सावळे- शहराध्यक्ष यवतमाळ, विलास वाघमारे,  शहर उपाध्यक्ष, पुष्पाताई शिरसाट महिला महासचिव मीनाताई रणीत उपाध्यक्ष, मधुकर कांबळे- कळंब तालुकाध्यक्ष सावते- सचिव, शीलाताई वैद्य, संगीता भवरे,सुकेशनी खोब्रागडे- संघटक,निशा निमकर,उत्तमराव कांबळे, दीपक नगराळे, सिद्धार्थ भवरे, बाळासाहेब वीर, अशोक मनवर, संदीप भगत, गजानन कोकाटे,गोलू सिरसाट, विलास भवरे, स्वप्निल कोल्हे, कवडू बांगडकर इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments