तर राज्यात २० हजार शिक्षकांची पदे रद्द होणार !

 हाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे धरणे आंदोलन



यवतमाळ : १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय लागु झाल्यास राज्यातील २० हजार शिक्षकांची पदे रिक्त होणार आहे. त्याचा परिणाम जि. प. शाळा, शासकिय शाळा, खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे संचमान्यतेचा अन्याय कारक शासन निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्यात राज्यव्यापी धरणे सत्याग्रह करणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामीण भागातील शाळांच्या मुळावर घाला घालणारा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा या मागणी साठी संपूर्ण राज्यात दि. 17 मार्च 2025 ला  एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहेत. हा शासन निर्णय अमलात आला राज्यात २० हजार शिक्षकांची पदे रद्द होणार आहे. तर यवतमाळ जिल्हयात 800 शिक्षक अतिरिक्त होणार आहे. परिणामी वर्गाध्यापनाला शिक्षकच नसतील तर विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे होणार ? असा सवाल उपस्थित होत आहे. त्याचा परिणाम जि. प. शाळा, शासकिय शाळा, खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर होणार आहे. ग्रामीण भागातील शाळा बंद पडून इंग्रजी माध्यमांच्या शाळा समृद्ध करण्याचा प्रयत्न दिसत आहे. या साठी ग्रामीण भागातील शिक्षण वाचवायचे असेल तर हा शासन निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच संचमान्यता करण्यात यावी. व जाचक अटी पासून सर्वघटकांची सुटका करावी. असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार यांनी कळविले आहे. दि 17 मार्च चे धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक बंधुभगिनी यांनी एक दिवसीय धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन संघटने तर्फे करण्यात येत आहे.

आंदोलनासाठी करणार प्रयत्न

आंदोलनाच्या यशस्वीते करीता राज्य जुनी पेंशन आघाडीचे प्रमुख प्रफुल्ल पुंडकर, जिल्हानेते नानासाहेब नाकाडे, जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार, सरचिटणीस संदीप मोहाडे, १०९ पतसंस्था अध्यक्ष महेश सोनेकर, गजानन देऊळकर, किशोर सरोदे, जिल्हा उपाध्यक्ष संजय, राधेश्याम चेले, गुट्टे पाटील, अभिजीत नवलकर, विजय लांडे, पुंडलिक बुटले, विजय मलकापूरे, अरविंद दहापुते, संभाजी हंगरगे, सुनिल हिंगमीरे, प्रविण शहारे, सुनिल भोयर, आशन्ना गुंडावार, विनोद क्षिरसागर, अमोल माळे, अमर गुजर, समीर डाखोरे, शेळके, राजेश बोकडे, पुरुषोत्तम मेश्राम, विजय लक्षेट्टीवार, विश्वनाथ कामनवार, कवडू गेडाम, विजय मलकापूरे, रविंद्र उमाटे, विशाल साबापुरे, अभिजीत ठाकरे, शंकर मेथाडे, गणेश भागवत, संभाजी निंबाळकर, मेघराज सुर्यवंशी, विजय मुंगे, विनोद भारसाकळे, मधुकर मोरझडे, प्रकाश टेकाळे, संजय कदम, शंकर हागेपाटील, राहूल लंबे, विलास भड, घनशाम निमकर, गणेश देऊळकर, विजय वटटी, रविंद्र नंदुरकर, संजय राऊत, मिलींद अंबलकर, उमेश बुटले, हेमंत सिडाम, ओमप्रकाश पिंपळकर, बाबाराव ढवस, अशोक चटप, पुष्पजीत राणे, मिलींद देशपांडे, गजानन गिरी, सत्यम चौधरी, उमेश बांगर, सुनिल राठोड, अर्चना भरकाडे, सुनिता जतकर, शालिनी सिरसाट, स्वाती महाजन, सुनिता बुटले, वनिता झुरळे, कुमुद डाखोळे, शुभदा येवले, सुनिता गेडाम, बबिता बारले, जया सिडाम, अर्चना कुचे, प्रिया शिंदे, नंदा ठाकरे, धांदे  इत्यादी परिश्रम घेत आहे.

Post a Comment

0 Comments