दोन युवकावर प्राणघातक हल्ला

यवतमाळ : बारमध्ये दारु पिवून गप्पा मारणा-या दोन युवकासोबत आवाज कमी करा असे म्हणून अन्य एका युवकाने वाद केला. त्यानंतर बारमधून बाहेर गेल्यानंतर दोन युवकावर धारदार शस्त्राने वार करुन प्राणघातक हल्ला केला. ही घटना एमआयडीसी लोहारा परिसरात एका इलेक्ट्रॉनिक कंपनिच्या समोर 9 मार्च रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली.

शालीक नथ्थुजी मुरमुरे वय 33 वर्ष रा. इचोरी एमआयडीसी लोहारा, मंगेश पांडुरंग शिंदे वय अं. 28 वर्ष रा. इचोरी असे जखमींचे नाव आहे. तर शिवा राठोड वय अं.19 वर्ष रा. एमआयडीसी लोहारा, वंश कोटेकर रा. मुंगसाजी नगर यवतमाळ अशी आरोपींची नावे आहे. दिनांक 9 मार्च रोजी शालीक हा गवंडी कामावरुन परत आल्या नंतर त्याचा मित्र मंगेश शिंदे हे दुचाकी वाहनाने यवतमाळात आले. लोहारा एमआयडीसी परिसरातील एका बारमध्ये दारु पिवून आपसात गप्पा मारत होते. अशातच साईडच्या टेबलवर बसलेला शिवा राठोड याने त्याच्या जवळ जावून तुमचा आवाज कमी करा म्हणून शिव्या दिल्या. यावेळी शालीक याने आमच्या पेक्षा तुमचा आवाज जास्त आहे असे म्हटले. यावेळी शिवाने तुम्ही बाहेर भेटा तुम्हाला बघुन घेतो अशी धमकी दिली. त्यानंतर रात्री 9 वाजताच्या सुमारास शालीक व मंगेश हे दोघे बारच्या बाहेर निघाले. दरम्यान बालाजी इलेक्ट्रॉनिक कंपनिच्या समोर शिवा व त्याचा मित्र वंश याने दुचाकीने येवुन चाकु काढला. त्यातील शिवाने शालीकच्या डाव्या हाताचे दंडावर वार केला. त शिवा राठोड व वंश कोटेकर यांनी मंगेश याचेवर पोटावर व छातीवर चाकुने वार करुन प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी शालीक मुरमुरे याच्या तक्रारीवरुन आरोपी शिवा राठोड, वंश कोटेकर याच्या विरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments