यवतमाळ : हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडवा सण देखील एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी नवीन कार्यांची सुरुवात करणे शुभ मानले जाते. म्हणूनचा या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो. जगाचा अन्नदाता शेतकरी राजा हे शेतातील कामाची सुरुवात पाडवा या सणापासून सुरुवात करतो.
दरवर्षी शेतकरी आपल्या शेतामध्ये नवीन सालगडी ठेवून मशागतीला सुरुवात करतो. गुढीपाडवा हा मुहूर्त असल्याने शेतामध्ये शेतकरी आपल्या अर्धांगिनीला घेऊन लक्ष्मीची पूजन व बैल जोडी नांगरणीची पूजन करून मशागतीच्या कामापासून सुरुवात केली जाते. पूजनानंतर लगेच शेतातच जेवण ( साधन) दिले जाते. आजही प्रथा ग्रामीण भागातील शेतकरी सुरेशराव गोरे सवना यांच्या शेतात पहावयास मिळाली.
0 Comments