यवतमाळ : भरधाव दुचाकी पुलाखाली कोसळून इसम ठार
झाला. ही घटना वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या भालर येथील हनुमान मंदिराच्या
बाजुला असलेल्या पुलाखाली २८ मार्च रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
महादेव अमृत बहादे वय ५३ रा. गोकुळ नगर वणी असे
मृतकाचे नाव आहे. २८ मार्च रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ते आपल्या एम. एच. २०
बि एन ९३०५ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. अशातच भालर येथे दुचाकीवरील नियंत्रण
सुटल्याने पुलाखाली दुचाकी कोसळली. या अपघातात महादेव बहादे हे जखमी होवून मृत्यू
झाला. अमन महादेव बहादे वय २२ रा. गोकुळ नगर वणी यांनी वणी पोलीस ठाणे गाठून
तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.
0 Comments