पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे आयोजन
यवतमाळ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्धी जन्मोत्सवा निमित्ताने बुधवार दि. १३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता वृक्षपूजन होळी महोत्सवाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक म.फुले चौक यवतमाळ येथे करण्यात आलेले आहे.
यावेळी वृक्षपूजनाने होळी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाज बांधव भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती यवतमाळ तर्फे पवन थोटे, सुरेश भावेकर, सुनील सोडगीर, अमोल शिंदे, देविदास कांबळे, विलास अवघड, शोभा पुनसे, मीनाक्षी गाढवे, स्मिता ढेकळे, लता गलाट, कल्पना मोहोड यांनी केले आहे.
0 Comments