यवतमाळ : शहरातील वाघापूर परिसरात एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना आज सोमवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
आशिष माणिकराव सोनोने वय 33 रा. प्रिया रेसिटंसी असे मृतकाचे नाव आहे. काल दिनांक 16 मार्च रोजी रात्री वाघापूर येथील आपल्या मित्राकडे गेला होता. यावेळी त्याच्यासोबत युवकाचावाद झाला होता. दरम्यान रात्री दोन वाजताच्या सुमारास दोन मारेकर्यांनी दगडाने ठेचून आशिषची हत्या केली. त्यानंतर आरोपीं त्या ठिकाणावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप , उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसने, लोहारा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार यशोधरा मुनेश्वर व पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांनी घटनास्थळ गाठले. आज सोमवारी सकाळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. वृत्त लिहिपर्यंत या हत्यचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. नुकताच लोहारा एमआयडीसी परिसरात एका युवकाचा खून झाला होता. या प्रकरणाची शाईवाढते न वाढत आज पुन्हा एका युवकाचा खून करण्यात आला. आठवड्याभरात शहरातील खुणाची दुसरी घटना आहे. पुढील तपास लोहारा पोलीस करीत आहे.
0 Comments