येथील लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालातील एका
प्राध्यापकाने रेल्वेखाली आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना आज मंगळवारी २४ मार्च
रोजी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास धामणगाव रेल्वे येथे घडली.
प्रा. संतोष गोरे वय ५० रा. श्रृष्टी अपार्टमेंट रेवती हॉटेलच्या मागे यवतमाळ असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. ते लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय यवतमाळ येथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. गेल्या काही दिवसापूर्वी प्रा. गोरे यांनी आपल्या पत्नीला पुणे येथे पाठविले होते. दरम्यान आज मंगळवारी २४ मार्च रोजी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास धामणगाव रेल्वे येथे मालगाडी खाली येवून आत्महत्या केली. हा प्रकार रेल्वे विभागाच्या कर्मचा-यांच्या लक्षात येताच त्यांनी चौकशी सुरु केली. आयकार्डच्या बेल्टवरुन मृतक हा यवतमाळ येथील अणे महाविद्यालातील कर्मचारी असल्याचे समोर आले. त्यावरून धामणगाव रेल्वे येथील कर्मचारी खचाळे यांनी महाविद्यालयात संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. प्राध्यापक गोरे यांच्या आत्महत्येचे कारण कळु शकले नाही. घटनास्थळावर चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये ३० ते ३५ जणांची नावे असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रीया सुरु आहे. प्रा. गोरे हे ‘आप्पा’ या टोपन नावाने परिचित असून, त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे. या घटनेची माहिती होताच महाविद्यालयीन क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
0 Comments