यवतमाळ : जुन्या वादासह महिलेवर वाईट नजर
ठेवण्याच्या कारणावरून मित्रांनीच मुफीतचा गेम केला आहे. मैदानात नेवून त्यांनी बियर
व दारु पिली. त्यानंतर बियरच्या बॉटलने मुफीतच्या गळ्यावर वार करुन त्याची हत्या
केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी दिग्रस व स्थानिक गुन्हे शाखेच्या
पथकाने तपासचक्रे फिरवून मारेकरी दोन मित्रांना बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस
सुत्रांनी दिली.
समीर वाजीद मिर्झा बेग वय-२० वर्षे रा.
देउरवाडा पुनवर्सन, ता. दिग्रस व म. जुनेद म. मुंतजीर वय-२३
वर्षे रा. देउरवाडा पुनवर्सन ता. दिग्रस अशी आरोपींची
नावे आहे. दिग्रस येथे फिर्यादी शेख नदिम शेख मुस्ताक वय-३० वर्षे व्यवसाय:
शेती रा. देउरवाडा पुनर्वसन ता. दिग्रस यांनी दिग्रस पोलीस ठाणे गाठुन फिर्याद दिली. त्यांचा मृतक भाउ
नामे शेख मुफीत शेख मुस्ताक वय-२४ रा. देउरवाडा याला दि. २४/३/२०२५ चे रात्री २०.००
ते दि. २५/३/२०२५ चे सकाळी ११.३० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणा
करीता त्याचा गळयावर धारदार शस्त्राने मारुन जिवाने ठार मारले. त्याचा मृतदेह हा फरफटत नेवून त्याचे कमरेला दोरीने बांधून ग्राम धानोरा बु.
येथील विलास किसन शेलकर यांचे विहीरीमध्ये मृतदेह फेकून दिल्याचे नमुद केले
होते. फिर्यादीच्या रिपोर्ट वरुन दिग्रस पोलीस ठाण्यात अप क. २३८/२५ कलम-१०३, २३८ भा. न्या. संहिता
अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला.
तपासाठी केले पथक तयार
पोलीस अधिक्षक कुमार चिंता व अपर पोलीस
अधिक्षक पियुष जगताप साहेब यांचे मार्गदर्शन, सहा. पोलीस अधिक्षक
तथा उपविभागीय पोलीस अधिकारी चिमुमूला रजनिकांत, स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक सतिष चवरे, सपोनि महल्ले व त्यांची टिम व पो.स्टे.चे
ठाणेदार सेवानंद वानखडे, तपास अधिकारी सपोनि राहुल वाघ, सपोनि प्रसेनजित जाधव पोउपनि विनाश जाधव, ग्रेपाउपनि रमेश जाधव व त्यांचा स्टाफ अशी वेगवेगळे पथके तयार करुन
तपासाला गती दिली.
पोलिसांनी केला तांत्रीक तपास
सदरचे गुन्हयामध्ये घटनास्थळाची पाहणी
केली तेथून मृतदेहाची ओळख पटवून मृतकाचे मित्र, कामावरचे सोबती, घरचे नातेवाईक इत्यादींना विचारपुस केली व तांत्रीक तपास केला. यामध्ये मित्रांनीच मुफीतचा खुन केल्याची माहिती समोर आली.
त्यावरुन पोलिसांनी दोन मित्रांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी खुन
केल्याची कबुली दिली.
वाईट नजर असल्याने केला खुन
मृतकाचा मित्र समीर वाजीद मिर्झा बेग
वय-२० वर्षे रा. देउरवाडा पुनवर्सन याला यवतमाळ येथील रुई येथून
ताब्यात घेवून त्याला कसुन विचारपुस केली. त्यांने व त्याचा मित्र
म. जुनेद म. मुंतजीर वय २३ वर्षे या दोघांनी मिळून जुन्या भांडणाचा राग व घरच्या महिलेला वाईट नजरेने पाहत असल्याने मृतक शेख मुफीत शेख मुस्ताक याचा खुन केला. त्याची बॉडी फरफटत नेवून नाल्यातून धानोरा बु.शिवारातील शेलकर यांचे शेतातील
विहीरीमध्ये दोरीने छातीला दगड बांधून फेकून दिली अशा कबुली जबाब दिला.
त्यावरुन समीर वाजीद मिर्झा बेग वय-२० वर्षे व म. जुनेद म. मुंतजीर वय-२३ वर्षे दोनही रा. देउरवाडा
पुनवर्सन ता. दिग्रस यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली
सपोनि राहुल वाघ पो.स्टे. दिग्रस हे करीत आहेत.
0 Comments