चरस, ड्रग्ज तस्करी : मुख्य सुत्रधाराला ठोकड्या बेड्या, एलसीबीची नागपूरात अंमली पदार्थ विरोधात कारवाई


यवतमाळ : नागपूर येथून एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका तस्कराला कळंब येथील उडानपुलाजवळ एका आरोपीला अटक केली होती. या प्रकरणातील नागपूर येथील मुख्यसुत्रधाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी नागपूर येथे ही कारवाई केली आहे. सदर आरोपीकडून साडेतीन लाखाचे ड्रग्ज व चरस जप्त करण्यात आले.

इस्तीयाक हुसेन मुस्तफा हुसेन ऊर्फ इस्तेयक खादीम रा. बडा ताजबाग हा निर्मल नगरी, टाऊनशिप नागपूर असे अटक केलेल्या आरोपीच नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमे दरम्यान दिनांक २८ मार्च रोजी कळंब येथे गुन्ह्यात नागपूर येथील अभय राजेंद्र गुप्ता वय ३० वर्ष रा. बुटीबोरी, . आय. डी. सी, जि. नागपूर याचे ताब्यातून २६ ग्रॅम अंमली पदार्थ एकुण किं. १,४०,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्यात फरार असलेला मुख्य सुत्रधार इस्तीयाक खातीब याला अटक करण्यासाठी तसेच अंमली पदार्थ संबंधाने जिल्ह्यात असलेले जाळे उध्वस्त करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक यांनी दिल्या होत्या. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुख्य सुत्रधाराचा कसोशीने शोध घेत होते. दि. ३० मार्च रोजी रात्री दरम्यान गुन्ह्यातील फरार आरोपी इस्तीयाक हुसेन मुस्तफा हुसेन ऊर्फ इस्तीयाक खादीम रा. बडा ताजबाग हा निर्मल नगरी, टाऊनशिप या उच्चभ्रु वस्तीमध्ये राहत असल्याची गोपनीय माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यावरुन निर्मल नगरी टाऊनशिप मध्ये सापळा रचला. आरोपीचा शोध घेत असतांना इस्तीयाक हा पळून जाण्याच्या तयारीत होता. एलसीबीच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेऊन त्याचेकडून १५.३० ग्रॅम MD (Mephedrone) नावाचा सदृश अंमली पदार्थ किंमत ७६,५००/- रु, व ०८.७५ ग्रॅम चरस (Hashish) किंमत ४३,७५०/- रु व अंमली पदार्थ विकून त्याचेकडे असलेली नगदी रक्कम २,३८,०००/- असा एकुण ३,५८,२५०/- रु चा मुद्देमाल जप्त केला. पो. स्टे कळंब येथे नोंद गुन्ह्यात अटक करण्यात आली.

विदर्भात नेटवर्क

इस्तीयाक खातीब हा ताजबाग दर्यामध्ये सेवेकरी (खादीम) म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे. तो अंमली पदार्थ विक्रीचे जाळे विदर्भात पसरवित असल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे.

कारवाई करणारे पथक

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, पोलीस अंमलदार योगेश गटलेवार, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, अजय डोळे, रितुराज मेडवे, आकाश सहारे, तसेच कळंब पोलीस ठाणयाचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र साळवे यांनी केली.

Post a Comment

0 Comments