पुलगाव, वर्धा : समता सैनिक दलाचा कार्यकर्ता सक्षम व्हावा यासाठी एक दिवसीय कार्यकर्ता बौद्धिक प्रशिक्षण शिबीर, मातोश्री कॉन्व्हेन्ट, पुलगाव येथे घेण्यात आले. कार्यशाळेचा मुख्य विषय "वर्तमान परीप्रेक्षात 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिजन, मिशन आणि आम्ही भारताचे लोक" हा होता. या विषयावर सखोल मार्गदर्शन मार्शल धम्मा कांबळे, समन्वयक, केंद्रीय कोअर कमिटी, समता सैनिक दल, भारत यांनी केले.
वर्तमानात समता सैनिक दलाच्या शाखा, दलाचे कार्यकर्ते गावागावात निर्माण करण्यासाठी कार्यशाळेत चिंतन कऱण्यात आले. गटचर्चा आणि प्रश्नोत्तरे या माध्यमातून पुढील कामाची दिशा ठरविण्यात आली. तर वर्धा जिल्ह्यात मिशन म्हणून काम करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते जोमाने काम करणार असे आश्वासन या कार्यशाळेचे अध्यक्ष, मार्शल दिलीप चक्रे अध्यक्ष, वर्धा जिल्हा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. या प्रशिक्षण कार्यशाळेत वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या तालुक्यातील महत्त्वाचे कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी केंद्रीय संघटक, मार्शल संजय ओरके, राज्य संघटक मार्शल मधुरंद नांदेकर , मार्शल सुनील रामटेके, मार्शल राजेंद्र गणवीर, मार्शल सुशील बांगर, मार्शल धर्मेंद्र अंबादे इत्यादी वर्धा जिल्हयातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती शशीकांत थूल महासचिव, महाराष्ट्र राज्य यांनी दिली.
0 Comments