महाबोधी विहार आमच्या सुपूर्द करा : बौद्ध बांधवांची तहसीलवर धडक

यवतमाळ : बौध्दगया येथील महाबोधी विहार आमच्या सुपूर्द करा या प्रमुख मागणीसाठी दिग्रस येथील बौद्ध बांधवांनी शहरातून मोर्चा काढून तहसील कारर्यालयावर धडक दिली. यावेळी आपल्या मागण्याचे निवेदन तहसीलदारांना दिले.

बौद्ध धर्मांशी संबंधित महत्त्वाच्या स्थळांचा सौंदर्यीकरण. जशी की बोध गया. राजगीर नालंदा यासारख्या ठिकाणचे संवर्धन पटना येथे बुद्ध स्मृती पार्क आणि बोधगया येथे महाबोधी संस्कृतिक केंद्र यासारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची उभारणे यासाठी केवळ बौद्ध समाजच नव्हे तर संपूर्ण देश शासनाचा ऋणी आहे. परंतु बोधगया मंदिर अधिनियम 19 49 हा बिहार सरकारने संमत केलेला अधिनियम आहे. सर्व बौद्ध उपासक उपासिका बुद्धगया मंदिर अधिनियम 1949 हा पूर्ण होता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तेराच्या विरोधात असल्यामुळे तसेच महाबोधी विहारावर असलेले ब्राह्मणाचे वर्चस्व कमी करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी

बौद्ध भिकूंचे बुद्धगया येथे उपरोक्त न्याय मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाचा विचार करून तात्काळ बिहार सरकारने निर्णय घेऊन बौद्ध समाजाला महाबोधी महाविवाराच्या संपूर्ण व्यवस्थापनाचे अधिकार प्रधान करावे. या न्याय मागणी करिता दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी दिग्रस येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्चाचे आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर दिग्रस शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी दिग्रस तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी कैलास जाधव, एड. रवि तुपसुंदरे, एड. दत्ता खंडारे, प्रदीप नगराळे, संजय मुजमुले, विजय अंभोरे, माझी न प  उपाध्यक्ष गणेश रोकडे. विजय पाटील, डॉ. वाल्मीक इंगोले, विनायक देवतळे, महादेव लंबे, पत्रकार किशोर कांबळे व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments