यवतमाळ : बनावट कागदपत्र तयार करुन शेती नावावर
केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा एका आरोपीला अटक
करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता २० मार्च पर्यंत पोलीस कोठडीत
ठेवण्याचे आदेश दिले आहे. यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या पथकाने ही कारवाई
केली.
सचिन शामराव राऊत, राहणार मंगेश नगर, भोसा रोड,
यवतमाळ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. १० फेब्रुवारी
रोजी पोलीस स्टेशन यवतमाळ शहर अपराध क्रमांक 233/25 कलम318(4), 336(2)(3), 340(2),3(5) B N S अन्वये गुन्हा
दाखल आहे. या प्रकरणातील दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी सचिन राऊत यास पाटीपुरा भागातून ताब्यात घेवून अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता २० मार्च पर्यंत पोलीस कोठडीत
ठेवण्याचे आदेश दिले आहे. यापुर्वी करण धवणे, नितेश चक्रे या दोन आरोपींना अटक
केली असून, आता अटक केलेल्या आरोपीची संख्या तीन झाली आहे. ही कारवाई यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनात सपोनी संजय आत्राम,
पोलीस हवालदार अन्सार बेग, विकास कमनर,
प्रवीण उईके यांनी केली.
0 Comments