यवतमाळ : शहरी व ग्रामिण भागात फायनांस
कंपनीचे जाळे पसरले आहे. महिला व पुरुषांना कर्ज देवून वसुली करण्याचा धंदा जोरात
सुरु आहे. एका फायनांस कंपनीच्या शाखा अधिका-याने
कर्जाची रक्कम वसुल केली. सदर रक्कम कंपनीच्या अकाउंमध्ये जमा करणे अनिवार्य आहे.
मात्र कंपनीच्या अधिका-याने लाखो रुपयाची अफरातफर केल्याची घटना उघडकीस आली.
अनिल यादव मुजमुले वय २९ रा. सायफळ ता.
माहुर जि. यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अरोहन फायन्सीयल सर्विसेस
लिमिटेड शाखा पुसद येथे शाखा प्रमुख म्हणुन कार्यरत आहे. आरोपी कडे लोकांना लोण देणे व लोकांकडुन
लोन वसुल करुन कंपनीच्या अकाउंटला जमा करण्याचे काम आहे. आरोपीने
ग्राहकांकडुन लोनची केलेली वसुली एकुण 1,97,936 रु कंपनीच्या
अकाउंटला जमा न करता अफरातफर केली. स्वताचे आर्थीक
फायदया करीता स्वताच वापरली व कंपनीचे मासीक ऑडीड झाल्याने आरोपीने केलेली अफरातर ही
कंपनीला माहीती पडली. त्यामुळे आरोपीने 1,97,936
रु. पैकी एकुण 1,00,000 कंपनीचा
अकाउंटला जमा केले. 97,936 रु. स्वताच्या
आर्थीक फायदयाकरीता वापरुन फसवणुक केली. सूरज
आत्माराम खोटेल वय ३२ रा. शिवनगर दुर्गापार्क नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
वसंतनगर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.
ऑडीटमध्ये भंडाफोड
कर्जदाराकडून लोनचे पैसे वसुल करून कंपनीत
पैसे जमा न करता यामध्ये अफरातफर करण्यात आली. कंपनीने केलेल्या मासिक ऑडीटमध्ये या
प्रकरणाचा भंडाफोड झाला आहे. २१ सप्टेंबर २०२४ ते ३ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत ही
अफरातफर करण्यात आली. त्यानंतर वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
0 Comments