ब्रेकिंग न्यूज : यवतमाळात युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळला, खून की आणखी काही ?

यवतमाळ : जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून  खून व अन्य गंभीर घटना घडण्याचे सत्र सुरू आहे. अशातच आज यवतमाळ शहरातील कॉटन मार्केट चौकात एका युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळला.  ही घटना आज शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास आली. 

अक्षय निरंजन शेंडे वय 28 वर्ष राहणार वंजारी वंजारी फैल असे मृतकाचे नाव आहे . यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तो हमालीचे काम करीत होता. काल गुरुवारी 27 मार्च रोजी सकाळी कामावर जातो म्हणून निघून गेला होता . रात्री बराच वेळ होऊ नये अक्षय घरी गेला नाही. दरम्यान आज शुक्रवारी 28 मार्च रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट जवळ अक्षयचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव, पीएसआय रितेश दीक्षित व यवतमाळ शहर पोलिसाच्या डीबी पथकाने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या घटनेची माहिती होतात परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती. मृतक अक्षय याला नेमके कोणी मारले किंवा त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस स्टेशन ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे व  एलसीबीच्या पथकाने  भेट दिली. 

Post a Comment

0 Comments