यवतमाळ : बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या
ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी भिक्खू संघाच्या वतीने धरणे आंदोलन करून
जिल्हाकचेरीवर धडक दिली. यावेळी भिक्खू संघाच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन
जिल्हाधिका-यांना देण्यात आले.
अखिल भारतीय भिकू संघ आणि बौद्ध उपासक संघटनांच्या नेतृत्वात आज
सोमवारी आझाद मैदान, यवतमाळ येथे धरणे
आंदोलन करण्यात अले. या आंदोलनात विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी,
कार्यकर्त्यांसह बौद्ध अनुयायांनी सहभाग घेतला होता. १८९५ मध्ये ब्रिटिश इंडियन पिनल कोड
अंतर्गत ब्राह्मणांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आले होते. त्या वेळी
कोर्टाने महाबोधी महाविहार बुद्धविहार म्हणून घोषित केला होता, परंतु त्यावर
ब्राह्मण पंडितांचा ताबा कायम ठेवला आहे. महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी
१९९२ पासून बौद्ध भिक्षूंनी अनेक आंदोलनांची सुरूवात केली होती. १९४९ मध्ये पं. नेहरू यांच्या नेतृत्वात पारित केलेला
महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट कमिटी ॲक्टही ब्राह्मणांच्या प्रभावाला विरोध करत असला
तरी त्याची अंमलबजावणी योग्य रितीने होऊ शकली नाही.
आता देशभरातील बौद्ध भिक्षूंनी महाबोधी महाविहारच्या
ब्राह्मण पंढितांच्या ताब्यातून मुक्तता प्राप्त करण्यासाठी
दि. १२ फेब्रुवारीपासून ऑल
इंडिया बुद्धिस्ट फोरमच्या वतीने बुद्धगया येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज
३ मार्च रोजी यवतमाळात धरणे आंदोलन करण्यात आले.
त्यानंतर बौद्ध भिक्षु व अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी एका
शिष्टमंडळाने जिल्हाधिका-या सोबत चर्चा करून निवेदन दिले. या आंदोलनात बौद्ध संघटनांसह अनुयायी सहभागी झाले होते.
0 Comments