टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जखमी

 

यवतमाळ : भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने एक दुचाकीस्वार ठार झाला असून, एक जण जखमी झाला. ही घटना पुसद शहरालगत असलेल्या आसेगावकर फार्म हाउस जवळ वरुड येथे दि. 8 मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

अमोल प्रल्हाद राठोड वय 30 वर्ष असे मृतकाचे नाव आहे. तर ज्ञानदेव चव्हान असे जखमीचे नाव आहे. ते दोघे ही एम एच 29 बी.यु. 5499 क्रमांकाच्या दुचाकीने आसेगाव कर फार्म हाउस समोरुन जात होते. अशातच एमएच- 29 बि. ई. 4581 क्रमांकाच्या टिप्पर चालकाने आपल्या ताब्यातील टीप्पर वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन दुचाकीला धडक दिली. यामध्ये अमोल राठोड हे ठार झाले. तर ज्ञानदेव चव्हान हा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. नितीन अरविंद चव्हान वय 34 रा अश्वीनपुर तांडा ता. पुसद यानी दिलेल्या तक्रारीवरुन टिप्पर चालका विरुध्द वसंत नगर पोलीस ठाण्यात अप क्र. 78/25 कलम 281, 125(ब), 106(1) भान्यासं अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

0 Comments