यवतमाळ
: जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील
पोहंडूळ येथील काही युवक दोन दिवसांपूर्वी आपल्या शालेय मित्रांसोबत ओमकारेश्वर येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यापैकी एका युवकाचा ओमकारेश्वर येथील नर्मदा नदीत बुडून
मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दिनांक ६ रोजी सांयकाळी
४ च्या सुमारास घडली.
दिनेश अमोल कदम
वय वर्ष (१९) असे मृत्यकाचे नाव आहे. पोहंडूळ
येथून १४ युवक देवदर्शनासाठी दोन दिवसापूर्वी निघाले. त्यांनी एक-दोन ठिकाणी दर्शन
घेऊन लगेच ओमकारेश्वर येथे दर्शनासाठी गेले. ओंकारेश्वर येथील नर्मदा नदीवर अंघोळ
(स्थान) करत होते. पाण्याचा अंदाज न लागल्याने दिनेश कदम हा युवक नदीत बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. तेथील रेस्क्यू टीमने त्या युवकाला
नदीच्या बाहेर काढून नातेवाईकाला माहिती दिली. या बाबतची माहिती मिळताच नातेवाईक ओंकारेश्वर येथे पोहोचले.
शुक्रवारी दि. ७ मार्च
रोजी सायंकाळी त्या
युवकाला पोहंडूळ येथे आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रेस्क्यू टीमने काढले बाहेर
नर्मदा नदीत आंघोळ
करत असणाऱ्या सर्वच नागरिकांना रेस्क्यू टीमने बाहेर काढले. तोपर्यंत त्या युवकाचा
जीव गेला होता. त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून त्या मृत्यू झालेल्या युवकाला
त्यांच्या घरच्यांच्या स्वाधीन केले. अशी माहिती ओमकारेश्वर येथील तहसीलदार राजेन्द्र सस्तया यांनी दिली.
0 Comments