दोषींना फाशीची शिक्षा द्या – युवक काँग्रेसची मागणी
संतोष अण्णा देशमुख यांनी पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागणाऱ्या
लोकांचा विरोध केला होता. याच कारणामुळे ९ डिसेंबर २०२४ रोजी त्यांचे अपहरण करून हत्या
करण्यात आली. या प्रकरणात
मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक अण्णा कराड यांचे नाव समोर आले आहे. कराड
यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ३१ डिसेंबर
२०२४ रोजी पुण्यात सिआयडी कार्यालयात
आत्मसमर्पण केले. मात्र,
त्या आधी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे आपल्यावरील
आरोप फेटाळले. या हत्याकांडामागे राजकीय षड्यंत्र
असल्याचा आरोप करत, धनंजय
मुंडे यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली
आहे. आज दि. ५ मार्च रोजी युवक काँग्रेसच्या वतीने
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद
बगाडे, शुभम शेंडे, आयुषी देशमुख, विद्या परचाके, मंगला सोयाम, प्रतीक नार्लावार, निशांत नैताम, वृषभ गुल्हाने, कॉम्रेड सचिन मनवर, फैसल पटेल, प्रिया काळे, प्रथम चव्हाण, नेहा डाखोरे, प्रा. पंढरी पाठे व
कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments