गोट्याला आग : होरपळून दोन जणावरांचा मृत्यू

यवतमाळ : जनावरे बांधण्याच्या गुरांच्या गोठ्याला भिषण आग लागली. या आगीत होरपळून दोन जणावरांचा मृत्यू झाला. तर दोन बैल भाजले आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री २:०० च्या सुमारास राळेगाव येथे घडली.

राळेगाव येथील शेतकरी मारोतराव ठोंबरे यांच्या जनावरांच्या गोट्याला आग लागली. ही आग एवढी भीषण होती की त्यात लाखोंचे नुकसान झाले.या आगिमध्ये एक बैल पूर्णपणे जळून मरणाच्या दारात उभा आहे. दुसरा एक बैल अर्धवट जळुन निकामी झाला आहे. तर आगित होरपळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक मोटार सायकल, तीन सायकल, बैलगाडी, शेतीला लागणारे अवजारे जळून खाक झाले आहे. यामध्ये शेतकरी मारोतराव ठोंबरे यांचे तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मैत्रे यांनी घटना स्थळ गाठुन पाहणी केली. तहसील व नगर पंचायचे कर्मचा-यांनी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास राळेगाव पोलीस स्टेशन करीत आहे.

 

Post a Comment

0 Comments