कॉंग्रेस पदाधिका-यांची जिल्हाधिका-यांकडे तक्रार
यवतमाळ नगर परिषदेने दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 3 वाजता मॅकेनाईज्ड रोड स्वीपींग, स्ट्रीट लाईट रिपेअरींग लिफ्ट / मशिन यांचा नगर परिषद यवतमाळ समोर लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुख्याधिकारी यांनी माजी नगरसेवक, नेतेमंडळीना आमंत्रित केले. मात्र स्थानिक आमदाराला साधा निरोप सुध्दा दिला नसल्याचा आरोप ओम तिवारी यांनी केला आहे. विनोद खरात, फायर विभाग प्रमुख यांनी स्वतः उपस्थित राहून पूर्ण सोहळ्याच्या यशस्वीतेकरीता प्रयत्न केले. मात्र सदर सोहळ्याचे निमंत्रण न देता यवतमाळ नगर परिषदेच्या जबाबदार मुख्याधिकारी व संबंधित विभाग प्रमुख यांनी जाणून बाजून हेतूपुरस्पर स्थानिय आमदारांचे हक्क भंग केल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करीत जिल्हाधिका-यांना निवेदन दिले आहे. भविष्यात यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी व विभाग प्रमुख यांनी अश्या प्रकारची चुक करू नये याकरीता मुख्याधिकारी व विभाग प्रमुखांवर हक्क भंगाची कार्यवाही करण्याची मागणी सुध्दा करण्यात आली आहे. निवेदन देतांना कॉंग्रेसचे ओम तिवारी, जर्रार खान, आकाश गायकवाड, जावेद अख्तर, सुनिल बोरकर, दत्ताभाऊ हाडके, नंदु कुडमेथे, जयसिंग चव्हाण, जैद पटेल, मुदस्सर नजर, महेंन्द्र कावळे, रमेश भिसनकर, संतोष हनवते, नामदेव मेटकर, गणेश पांडे, बुसनदास राठोड, सुमित राठोड, लालाजी तेलगोटे, पंडीत कांबळे, सुशील रामोके, किशोर लोखंडे उपस्थित होते.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून अपप्रचार
विधानसभेची निवडणूक हारल्यानंतर सुध्दा यवतमाळच्या माजी आमदार प्रत्येक शासकीय लोकार्पण सोहळयावर लक्ष ठेऊन स्वताचा निधी असल्याचा सोशल मिडीयाच्या माध्यमातून अपप्रचार करीत आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषदेतील लोकार्पण सोहळयात सुध्दा त्यांचेच पदाधिकारी उपस्थित होते. खनिज विकास निधीतून झालेली कामे सुध्दा त्यांच्याच फंडातील असल्याचा बोभाटा केला जात आहे. जनतेने निवडून दिलेल्या आमदाराचा सन्मान ठेवा अशी मागणी केली आहे.
0 Comments