यवतमाळ : नेर तालुक्यातील चिकणी डोमगा या गावात
वार्ड क्रमांक एक व तीन मध्ये दूषीत पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे त्या
भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले
आहे. या संदर्भातील माहिती ग्रामपंचायत सदस्यांना दिली असून, याकडे दुर्लक्ष होत
आहे. चिकणी डोमगा येथे वार्ड क्रमांक एक व तीन मध्ये गेल्या अनेक दिवसापासून दूषित
पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे लहान मुलांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या
बाबतची माहिती ग्रामपंचायतला दिली असून, गेल्या २५ दिवसापासून याकडे दुर्लक्ष होत
आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने शुध्द पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी गौतम मेश्राम,
आरती खडसे, सुजाता मेश्राम, सतीश मेश्राम, कृष्णा गणविर, संघपाल मेश्राम यांनी
केली आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments