अभय राजेंद्र गुप्ता वय ३० वर्ष रा. बुटीबोरी, एक. आय. डी. सी, जि. नागपूर असे आरोपीचे नाव आहे. २८ मार्च रोजी आरोपी कळंब येथील नागपूर तुळजापूर महामार्गावरील बाभुळगाव
ते कळंब दरम्यान असणाऱ्या उड्डाणपुलाखाली येणार असून, तो MD (Mephedrone) नावाचा सदृश अमली पदार्थ विक्री करणार
असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरुन
पथकाने उडानपुलाखाली सापळा रचला. यावेळी आरोपी पळून जाण्याच्या तयारीत
असतांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीच्या बॅगची झडतीत २६ ग्रॅम MD (Mephedrone) नावाचा सदृश अमली पदार्थ व अंगझडतीत एक मोबाईल असा एकुण १,४०,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुढील कारवाई करीता पो. स्टे कळंब यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक
पोलीस निरीक्षक संतोष मनवर, पोलीस अंमलदार योगेश
गटलेवार, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, अजय डोळे, रितुराज मेडवे, निलेश राठोड, आकाश सहारे यांनी केली.
0 Comments