‘त्या’ घटनेचे पडसाद : उमरखेडमध्ये कडकडीत बंद

 आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

यवतमाळ : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्या करण्यात आली. तीन महिन्यापासून राज्यातील राजकारण समाजकारण ढवळून निघाले. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली. तसेच राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना दोन दिवसापूर्वी राजीनामा द्यावा लागला. या घटनेने फोटो समोर आल्याने राज्यात संतापाची लाट ऊसळली असून, असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी बंद केल्या जात आहे. आता आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी. या प्रकरणात धनंजय मुंडे सह जे पोलिस अधिकारी या गावगुंडांना सहकार्य करीत होते. त्या सर्वांना सह आरोपी करून शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी आज दि ६ मार्च रोजी उमरखेड तालुक्यामध्ये व शहरांमध्ये आज कडकडीत बंद ठेवल्यात आले. 
यावेळी सकल मराठा समाजासह इतर समाजातील असंख्य कार्यकर्ते, सर्व पक्षाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कार्यकर्ते जमून  घोषणाबाजी  करण्यात आली. या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सर्व व्यापाऱ्यांनी बंदला उत्सूर्फ सहभाग नोंदविला. यावेळी पोलीस स्टेशन तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

Post a Comment

0 Comments