सात गुन्हे शिरावर असलेला सराईत गुन्हेगार स्थानबध्द

यवतमाळ : पोलीस दप्तरी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला छत्रपती नगर येथे स्थानबद्ध करण्यात आले. यवतमाळ शहर पोलिसांनी ही कारवाई केली.

साहिल रफिक शेख वय 25 वर्ष रा. गौतम नगर यवतमाळ असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. दिनांक ०४/०३/२०२५ रोजी पो.स्टे. यवतमाळ शहर जि. यवतमाळ येथील हददीत राहणार इसम नामे साहील रफीक शेख वय २५ वर्ष रा. टींबर भवनमागे गौतम नगर, यवतमाळ याच्यावर शरीराविरुध्द एकुण ०७ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने पोलीस अधिक्षक  यवतामळ व  उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव पो.स्टे. यतवमाळ शहर यांच्या मार्फतीने एम.पी.डी.ए. प्रस्ताव तयार करुण जिल्हाधिकारी साहेब यांना सादर केला असता दि. ०३/०३/२०२५ रोजी जिल्हाधिकारी यांनी धोकादायक इसम साहील रफीक शेख वय २५ वर्ष रा. टींबर भवनमागे गौतम नगर, यवतमाळ याला स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत झाले. धोकादायक व्यक्ती साहील रफीक शेख वय २५ वर्ष रा. टींबर भवनमागे गौतम नगर, यवतमाळ यास नागपुर येथुन ताब्यात घेवून मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबध्द करण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक कुमार चिंता,  अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप , उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे , पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन यवतमाळ शहर ठाणेदार पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, पोउपनी धनराज हाके, स्वप्निल कावरे पोलीस अंमलदार रविंद्र नेवारे, अंकुश फेंडर, सुनिल पैठणे, राजकुमार कांबळे यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments