आंतरराष्ट्रीय धावपटू ‘देव’ व ‘दिपश्री’चा गौरव

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समितीचा पुढाकार

यवतमाळ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय धावपटू देवदिपश्रीचा गौरव करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती तर्फे साप्ताहिक पूजन केल्या जात आहे. त्या निमित्ताने रविवार दि. २ मार्च रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तैलचित्राचे एकोणचाळीसावे पुजन अजय पाटिल साहेब व माधुरीताई पाटिल यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी व्यसनमुक्ती संदेशासाठी अविरत १३ तासात १३६. ७ किलोमीटर धावणारा एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त देव चौधरी यांचा गौरव करण्यात आला. तसेच मल्लखांब मध्ये बर्लीन येथे योगा ट्रेनर म्हणून कार्यरत असेलेली यवतमाळची कन्या दिपश्री देशपांडे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शोभा पुनसे, मीनाक्षी गाढवे, लता गलाट, कल्पना मोहोड, समीक्षा राठोड, यशस्वी वडतकर, ओजस खराटे, धनश्री खवसे, अनिता लोखंडे, रुची तिवारी, जितेंद्र सातपुते, सचीन भेंडे, सुशील कोठारी, धनंजय लोखंडे, दिनेश गिरोलकर, अनिल देशपांडे, पंकज तिवारी, प्रा. महेश डोंगरे, अर्जुन तिवारी, मौर्य रुपणर, श्रीकांत खवसे, अविनाश लोखंडे, कीर्ती मेहता, राजू जॉन, पवन थोटे, सुरेश भावेकर, दिपक कोम्पेलवार, अमोल शिंदे, सिद्धार्थ भगत, सुनील सोडगीर, अंकुश गलाट, विलास अवघड आदी समाज बांधव उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments