विद्यार्थीनींना वस्तीगृहात कोंडले : आदिवासी मंत्र्याच्या जिल्ह्यातील प्रकार

आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखल्याचा विद्यार्थीनींचा आरोप


यवतमाळ : आदिवासी मुलींचे वस्तीगृह यवतमाळच्या मुलींना कुलूप लावुन हॉस्टेलमध्ये कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. वार्डन आणि पोलीस प्रशासनाने आणि गेट वर बॅरिकेट सुद्धा लावले आहे. ३ मार्च रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. कारण हॉस्टेलच्या मागणी घेऊन प्रकल्प कार्यालयाला मुली आंदोलन करणार होते. विद्यार्थीनींना कैद्यासारखी वागणुक देत असच्या आरोप आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थीनींनी केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वार्षिक महागाई दुरानुसार प्रत्येकवर्षी आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्हास्तरीय मुला-मुलींच्या वसतीगृहामध्ये लागू असलेल्या डी. बी. टी. (DBT) या योजनेमध्ये प्रत्येकवर्षी महागाई दरानुसार वाढ करून ती ती वाढ दरवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडण्यात यावी. आदिवासी वसतीगृहात प्रवेश झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनीला ८५% वसतीगृहात राहणे बंधनकारक किंवा अनिवार्य. आणि तो किंवा ती सतत ६० दिवस वसतीगृहात गैरहजर असल्यास त्याविद्यार्थी / विद्यार्थीनीचा वसतीगृहातून प्रवेश रद्‌द करण्यात यावा या मागणीसाठी  ४ मार्च रोजी यवतमाळ मते पांढरकवडा लाँग मार्च काढण्यात येणार होता. या आंदोलनात सदर विद्यार्थीनी सहभागी होणार होत्या. त्यामुळे आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थीनींना आतमध्ये कोंडून ठेवले होते. या बाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायल झाला आहे. त्यामुळे आदिवासी मंत्र्याच्या जिल्ह्यात चालल तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे.

बिरसामुंडा चौकात केले आंदोलन

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या DBT योजनेत वाढ करावी. 60 दिवसाहुन अधिक दिवस अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करा. वस्तीगृहात प्रवेश झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीला 85% वसतिगृहात राहणे बंधनकारक करावे यासह विविध मागण्यांसाठी शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी बिरसा चौक परिसरात आंदोलन केलेयवतमाळ ते पांढरकवडा येथील आदिवासी प्रकल्प कार्यालय पर्यंत लॉग मार्च काढण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

प्रकल्प अधिका-यांनी दिली भेट

यवतमाळ येथील आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी आज आंदोलनाचे आयोजन केले होते. रात्री वस्तीगृहाच्या फाटकाला कुलुप लावुन विद्यार्थीनींना आतमध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप विद्यार्थीनींना केला होता. या संदर्भात प्रकल्प अधिका-यांनी पांढरकवडा येथे विद्यार्थ्यांनी येवू नये, मी वार्डन सोबत संपर्क साधून उद्या ४ मार्च रोजी प्रत्यक्ष येवून चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. रात्रीच्या वेळी मुलींनी बाहेर निघने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याने त्याना वस्तीगृहात ठेवले असेल अशी प्रतिक्रीया एकात्मीक आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी आयएएस अमित रंजन यांनी दिली. तसेच ४ मार्च रोजी आयएएस अमित रंजन यांनी यवतमाळात भेट देवून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याच्या समस्या निकाली काढण्यात येईल असे अश्‍वस्त केले. 

 

Post a Comment

0 Comments