पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचा उपक्रम
यवतमाळ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
यांच्या त्रिशताब्धी जन्मोत्सवा निमित्ताने वृक्षतोड करुन होळी साजरी न करता बुधवार
दि.१३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता वृक्षपूजन करुन होळी महोत्सव पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर स्मारक म.फुले चौक यवतमाळ येथे साजरा करण्यात आला. यावेळेस उपस्थितानी वृक्षपूजन करुन होळी महोत्सव साजरा केला. या कार्यक्रमाला
पवन थोटे, सुरेश भावेकर, सुनील सोडगीर आदी समाज बांधव, भगिनी मोठ्या प्रमाणात
उपस्थित होते. यावेळेस वृक्षतोड न करता वृक्षपूजनाने पर्यावरण पुरक होळी साजरी करण्याचा
संदेश समितीने दिला.
0 Comments