पाणी पुरवठा दोन दिवस बंद

यवतमाळ,:  महाराष्ट्र विज वितरण कंपनी यवतमाळ यांचेव्दारे ११ के. व्ही. वरून होणारा विज पुरवठा वर्धा-यवतमाळ - नांदेड रेल्वे विभागाच्या कामामुळे दि.7 व दि.8 मार्च रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण यवतमाळ शहरास होणारा पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहील. विज पुरवठा सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत सुरू करण्यात येईल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उपविभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत उमप यांनी कळविले आहे.


Post a Comment

0 Comments