यवतमाळ : विभक्त होणा-याच्या उंबरठयावर पोहचलेल्या १२ जोडप्यांनी पुन्हा सुखाने नांदण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार दिनांक २२ मार्च २०२५ रोजी कौटुंबिक न्यायालयात लोकभारती आयोजन केले होते. यामध्ये 12 जोडप्यांनी पुन्हा सुखाने नांदण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ नागेश न्हावकर, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष रं. काफरे व के. ए. नाहर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत पार पडली. यामध्ये कौटुंबिक स्वरुपाचे २२ दावे निकाली काढण्यात प्रशासनाला यश आले. या दाव्यांमधील १२ जोडप्यांनी घटस्फोटाचा मार्ग सोडुन पुन्हा संसार सुरु करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या रेशीमगाठी पुन्हा जुळल्याने त्यांचे परिवार व मुले आनंदी झाले आहेत. यावेळी न्यायाधीशांच्या हस्ते सोबत नांदायला गेलेल्या जोडप्यांना ''नांदा सौख्यभरे’’ चे प्रमाणपत्र व भेटवस्तु देउन सन्मानित करण्यात आले. या निमीत्ताने एकत्र नांदायला गेलेल्या जोडप्यांकरीता सेल्फी पॉंईटचे आयोजन करण्यात आले होते. सद्या न्यायालयात वैवाहीक वादाचे व पोटगीसाठीचे ७६५ दावे प्रलंबित आहेत. यापैकी ५५ दावे लोक अदालतीसमोर निकाली काढण्यासाठी ठेवले होते. न्यायाधीश सुभाष रं. काफरे यांच्या मार्गदर्शनाखाली २ रे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ट स्तर, यवतमाळ श्री. अमितसिंह र. मोहने, विवाह समुपदेशक ज्योती जी. माटे व अॅड. सुरुची उपाध्याय यांनी पॅनल सदस्य म्हणुन काम पाहिले.
लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय टी. जैन, माजी अध्यक्ष अॅड अमीत बदनोरे व कार्यकारणी सदस्य व रोटरी क्लब ऑफ यवतमाळचे अध्यक्ष धर्माधिकारी मॅडम, राजेश शर्मा, मेहेरे मॅडम, जलालुद्दीन गिलाणी, माजी अध्यक्ष, पी. ए. हर्षे, रोटरी उपाध्यक्ष यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच प्रभारी प्रबंधक नरेश एस. दहातोंडे, सहा. अधिक्षक, अरुण एच. गट्टावार, प्रमोद फाळके, लघुलेखक, मनिष एम. गंपावार, वरिष्ठ लिपीक, निसार एन.शेख, कनिष्ठ लिपीक, अमोल सी. ठाकरे, कनिष्ठ लिपीक, उत्कर्षा आर. कनवाळे, कनिष्ठ लिपीक, एकनाथ पी. बाहेकर, पांडुरंग डी. वाघमारे व अनिता सोनटक्के. तसेच पोलीस कर्मचारी निकेश राठोड व महिला पोलीस कर्मचारी मोनीका नेवारे यांनी चोख बंदोबस्त ठेवुन लोकअदालतीच्या सहकार्य केले.
0 Comments