अफरातफर : फायनांस कंपनीच्या अधिका-यासह ग्राहक सेवा प्रतिनिधीवर गुन्हा

 


यवतमाळ : मायक्रो फायनांस कंपनीकडून दिलेल्या कर्जाची वसुली करण्यात येते. कर्जदारांकडून वसुल केलेल्या रक्कमेतून अडीच लाख रुपयाची अफरातफर केल्याची घटना समोर आली आहे. दारव्हा येथील फायनांस कंपनीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दारव्हा पोलिसांनी कंपनीचे अधिकारी, ग्राहक सेवा केंद्र चालक अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सुमित सुभाषराव इंगळे वय 30 व्यवसाय शाखा प्रमुख आरोहन मायक्रो कंपनी दारव्हा. रा चिखल सावंगी, नाजीर नूर शेख वय 28 वर्ष सहायक शाख प्रमुख रा. बोरगाव ता. आर्णी, आकाश दिलीप लायसे वय 30 वर्ष ग्राहक सेवा प्रतीनिधी राहुल नगर आकोट ता. आकोट, हत्तीक बाळु चव्हान वय 25 वर्ष ग्राहक सेवा प्रतीनिधी रा. पिंपळखुटा, प्रज्वल प्रेमचंद डोंगरे वय 24 वर्ष ग्राहक सेवा प्रतीनिधी रा चिंचाली गवळी अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकारी व ग्राहक सेवा चालकांची नावे आहे. दारव्हा शहरातील गोदावरी नगर वार्डात आरोहन मायक्रो फायनान्स कंपनी आहे. आरोपीतांनी संगणमत करुन कंपनीच्या प्रतीमेला धोका पोहचुन स्वताच्या आर्थीक फायदयाकरीता अफरातफर केली. आरोहन मायक्रो फायनान्स कंपनीत 24 ऑगस्ट 23 ते 23 नोव्हेंबर 2024 दरम्यान नौकरीवर कार्यरत असताना वेगवेगळ्या केंद्रामधील वेगवेगळ्या ग्राहकाकडुन वेगवेगळया तारखांना ई.एम.आय. म्हणुन एकूण 2,43, 860 रु. जमा करुन कंपनीच्या खात्यात ते पैसे जमा केले नाही. ग्राहकांना ही ते पैसे परत केले नसून, ग्राहकांची फसवणुक केली आहे. सुरज आत्माराम खोटले प्रादेशीक प्रमुख आरोहन मायक्रो फायनान्स कंपनी दारव्हा यांच्या तक्रारीवरुन दारव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments