क्रुझर पलटी : दोन जण ठार, १४ जण जखमी

 साईबाबाच्या दर्शनाला जातांना घडली घटना

यवतमाळ : शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी भाविकांना घेवून जाणा-या क्रुझरचा टायर फुटल्याने सदर वाहन पलटी झाले. या अपघातात दोन जण ठार झाले असून, १४ प्रवासी जखमी झाले. ही घटना समृध्दी महामार्गावर मुंबई कॉरिडॉर चॅनेल नंबर ३४४.७ वर घडली.

विद्याबाई साबळे वय ४० वर्ष, मोतीराम बोरकर वय ६० वर्ष रा. आसेगांव देवी ता. बाभूळगांव मृतकांची नावे आहे. तर कमला भास्कर जाधव, छाया चव्हाण, सुशीला गाणार, ज्योती राऊत, मीरा राऊत, सिंधू राऊत, मीरा बाई गोटफोडे, हिमांशु खोडे १० वर्ष, बेबी बाई गेलोत, संतोष साखरकर चालक, प्रतिभा वाघाडे, भावना राऊत, त्यांची लहान मुलगी, रमेश राऊत अशी जखमींची नावे आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील आसेगांव देवी येथील नागरिक शिर्डीला साई बाबाच्या दर्शनासाठी एम. एच २५ आर ३५७९ क्रमांकाच्या क्रुझर या वाहनाने जात होते. कुझर गाडीचे समृध्दी महामार्गावर मुंबई कॉरिडॉर चॅनेल नंबर ३४४.७ वर अचानक टायर फुटला. त्यामुळे क्रुझर वाहन पलटी झाले. या अपघातात गाडीतील २ प्रवाशांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर१४ प्रवासी जखमी झाले. कुझरमधील विद्याबाई साबळे, मोतीराम बोरकर यांचा घटनास्थळावर मृत्यू झाला आहे. तर १४ प्रवासी जखमी झाले आहे. जखमी प्रवाशांना समृद्धी महामार्गाच्या रुग्णवाहिकेद्वारे जालना येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच आसेगाव देवी गावावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments