दिग्रस तालुक्यातील घटना : मित्रांनीच खून केल्याचा संशय
यवतमाळ : धारदार शस्त्राने गळा कापून डोक्यावर
घाव घालुन एका युवकाची निघृण हत्या करण्यात आली. मारेक-यांनी युवकाचा मृतदेह
विहिरीत फेकुन दिला. ही घटना दिग्रस तालुक्यातील धानोरा बु. शेत शिवारात २५ मार्च
रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मित्रांनीच या युवकाची हत्या केली
असावी असा संशय व्यक्त होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या घटनेने दिग्रस तालुक्यात
खळबळ उडाली आहे.
शेख मुफित शेख मुस्ताक वय २३ रा. देउरवाड़ा
पुनर्वसन असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा रोजमजुरीचे
काम करीत होता. आज दि. २५ मार्च रोजी धानोरा बु. येथील विलास शेलकर यांच्या विहिरीत
या युवकाचा मृतदेह आढळून आला. विहिरीच्या काठावर रक्ताचा सडा दिसल्याने
शेत मालक याने ही माहिती धानोरा बु. येथील पोलीस पाटील गोविंद गावंडे यांना दिली.
पोलीस पाटील यांनी तात्काळ या घटनेची माहिती दिग्रस पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत
व पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे व पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, विहिरीतील पाण्यावर रक्ताचे
थर दिसत होता. विहिरीतील पाणी मोटार पंपाने कमी करून बघितले असता
मृतदेहाच्या कमरेला दोर बांधून आढळला. त्यांच्या मानेवर धारदार
शस्त्राचे दोन घाव व डोक्यावर एक घाव दिसला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.
खाटीला दोर बांधून मृतदेहाला बाहेर काढले. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी
पोलिसांनी फॉरेन्सिक, फिंगरप्रिंट, डॉग युनिट यांना पाचारण करण्यात आले.
मृतकाच्या भावाने दिली तक्रार
या प्रकरणी दिग्रस पोलिसात मृतकाचा भाऊ
फिर्यादी मो. नदीम शेख मुस्ताक रा. देऊरवाडा याने दिग्रस पोलिसात तक्रार दिली. मृतकाचे मित्रांसोबत वाद झाला होता. या वादातून
खून झाला असल्याने त्यांची चौकशी करण्याचे तक्रार नोंदवली आहे. मृतकाच्या पश्चात आई, वडील, ३ भाऊ, २ बहिणी असा परिवार
आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून पुढील तपास उपविभागीय पोलीस
अधिकारी चिलुमुला रजनीकांत व पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे सह पोलीस तपास करीत आहे.
0 Comments