BREAKING NEWS : यवतमाळच्या लॅन्ड डेव्हल्पर्सचा रेल्वेखाली पडून मृत्यू


सेवाग्राम एक्सप्रेसने मुंबई येथे जाण्यासाठी रेल्वेत चढत असतांना पाय घसरुन रेल्वेखाली पडून यवतमाळच्या लॅन्ड डेव्हल्पर्सचा मृत्यू झाला. ही घटना धामणगाव रेल्वे स्टेशनवर आज बुधवारी रात्री १२.४० वाजाताच्या सुमारास घडली.

निखील दिलीप सराफ वय ४५ रा. शिवनेरी सोसायटी यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. ते लँन्ड डेव्हलपमेंटचे काम करीत होते. मृतक व त्यांचा मित्र मुकेश भुतडा यांच्यासोबत बुधवार दिनांक २६ मार्च रोजी रात्री १२.४० वाजताच्या सुमारास सेवाग्राम एक्सप्रेसने मुंबई येथे खरेदी करण्यासाठी जात होते. अशातच धामणगाव रेल्वे स्टेशनवर सुरु झालेल्या रेल्वेत चढत असतांना पाय घसरला. यामध्ये रेल्वेखाली पडून निखील सराफा यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच धामणगाव रेल्वे पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह धामणगाव रेल्वे येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. या घटनेची वार्ता यवतमाळ शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अथर्व व बराच मोठा आप्त परिवार आहे.

Post a Comment

0 Comments