मुंबई : विचारशक्ती,तर्कसंगती आणि प्रभावी संवाद कौशल्याच्या बळावर यश मंजुश्री किशोर चव्हाण याने CII - द इंडिया वी वाँट राष्ट्रीय वादविवाद स्पर्धेत विजेतेपद पटकावत आपली असामान्य बुद्धिमत्ता सिद्ध केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित स्पर्धेत संपूर्ण देशभरातून अनेक प्रतिभावान वक्त्यांनी सहभाग घेतला होता.
ही स्पर्धा देशातील नावाजलेल्या उद्योग व विचारवंत संघटना CII (Confederation of Indian Industry) यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे, यशने ही स्पर्धा जिंकताना केवळ उत्कृष्ट वादविवाद कौशल्यच नव्हे,तर आपल्या विचारसंपन्न भाषणाद्वारे परीक्षकांचेही मन जिंकले.
स्पर्धेच्या अंतिम फेरीत यशला डॉ.विठ्ठल कामत आणि अन्य प्रतिष्ठित परीक्षक मंडळाच्या उपस्थितीत वादविवाद सादर करण्याची संधी मिळाली.परीक्षक मंडळात डॉ. मोहन बी.राव (MBR), ॠषी कुमार बागला (उपाध्यक्ष, CII),अथिसा केशवानी , उमेश राठोड, अभिषेक मांडे भोत, सुंदर सुब्रमण्यम आणि डॉ. प्रा. अपूर्वा पालकर यांचा समावेश होता. या मान्यवरांसमोर आपल्या विचारांना समर्थपणे मांडण्याची संधी मिळणे हीच एक मोठी प्रतिष्ठेची बाब होती. पण यशने केवळ सहभाग घेतला नाही. तर आपली बुद्धिमत्ता आणि संवादकौशल्य सिद्ध करत थेट विजेतेपदावर आपले नाव कोरले.
0 Comments