
अमरावती (प्रादे) वन विभागाअंतर्गत कार्यरत शिघ्र बचाव दल व त्यांचे चमु तसेच पशुवैद्यकीय अधिकारी, गोरेवाडा, नागपुर व त्यांचे चमु व वन प्रकल्प विभाग यवतमाळ येथील अधिकारी यांच्या उपस्थितीत दि.19 मार्च 2025 पासुन वाघाला बेशुध्द करून तारेचा फास काढणेबाबत मोहीम चालु करण्यात आली. परंतु दि.20 मार्च 2025 रोजी सदर क्षेत्रात लावलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये वाघाच्या गळयात अडकलेला तारेचा फास हा निघल्याचे दिसून आले. वाघास कुठल्याही प्रकारची जखम झाल्याचे दिसून आले नाही. करीता एनटीसीए चया एसओपी नुसार गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक घेवून त्यांच्या शिफारशीने सदरची मोहीम दि.20 मार्च 2025 दुपारी 12.00 पासुन थांबविण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्हयातील पांढरकवडा वन्यजीव विभाग, पांढरकवडा वनविभाग व वन प्रकल्प विभाग यवतमाळ यांच्या क्षेत्रात वारंवार अश्या घटना होत असल्याने पांढरकवडा वन्यजीव विभाग, वनविभाग पांढरकवडा व वन प्रकल्प विभाग यवतमाळ वनविकास महामंडळ यांच्या मार्फत संपूर्ण क्षेत्रामध्ये Anti Snare Drive घेण्यात येत आहे. संपूर्ण जनतेस आवाहन करण्यात येते की, आपल्या शेतात वन्यप्राण्यांच्या शिकार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे फासे लावण्यात येवू नये असे आढळल्यास आपल्यावर Wildlife Protection Act 1972 अन्वये कार्यवाही करण्यात येईल.
वाघास फास मुक्त करण्याची मोहीम उत्तम सावंत, महाव्यवस्थापक नागपुर प्रदेश नागपुर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. सदर मोहीम यशस्वी होण्याकरीता डॉ. मयुर पावसे, पशुवैद्यकीय अधिकारी, गोरेवाडा, अमोल गावनेर व चमु, स्वप्नील भोवते, विभागीय व्यवस्थापक, वन प्रकल्प विभाग यवतमाळ, नितीन शिंगणे, वनपरिक्षेत्र अधिकारी घाटंजी, ए.बी.डांगे, वनपरिक्षेत्र अधिकारी वणी, सहभागी सर्व वनरक्षक व वनमजुर यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच या मोहीमेत वन्यजीव रक्षक रमजान विराणी व सुबोध काळपांडे, निसर्ग मित्र मंच यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments