यवतमाळ : पुणे येथून चंद्रपूर कडे जाणाऱ्या डी एम आर ट्रॅव्हल्स झाडावर आदळली. या अपघातात दहा प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. ही घटना यवतमाळ दारवा मार्गावरील इचोरी फाटा येथे आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.
एम एच 34 / बीजी 0077 क्रमांकाची ट्रॅव्हल्स पुणे येथून यवतमाळ मार्गे चंद्रपूर कडे जात होती. या ट्रॅव्हल्स मध्ये 30 प्रवासी प्रवास करीत होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स झाडावर आढळली. या अपघातात दहा जण जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. माहिती मिळतात यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत कावरे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. या अपघातामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. ट्रॅव्हल्स झाडावर ओढल्याने 30 प्रवाशाचे प्राण वाचले. वृत्तलेपर्यंत जखमींची नावे कळु शकली नाही.
0 Comments