ब्रेकींग: पुसद शहरात 50 बोगस बांगलादेशी : भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा दावा: सोमय्या पुसद पोलीस ठाण्यात दाखल

राहुल वासनिक / तहलका टाईम 

यवतमाळ : जिल्ह्यातील पुसद शहरात 50 बोगस बांगलादेशी असून त्यांच्याकडे बोगस बांगलादेशचे जन्म प्रमाणपत्र असल्याचा दावा भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी ते पुसद पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. या दाव्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

पुसदमध्ये बांगलादेशी असल्याचा खळबळ जनक आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. सोमय्या आज पुसद पोलीस स्टेशनला दाखल झाले आहे. त्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने शहर पोलीस स्टेशनला गर्दी केली होती.  यावेळी पंजाब भोयर तालुकाध्यक्ष पुसद यांनी हातोडा गिफ्ट देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. सोमय्या हे 50 जन्म प्रमाणपत्र संदर्भात पुसद शहर ठाणेदार उमेश बेसकर यांच्याशी चर्चा केली.  गुन्हा दाखल करण्यात संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. याचर्चे दरम्यान मुख्याधिकारी अरुण वायकोस तसेच तहसीलदार महादेव जोरवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments