प्रिती सचिन डाखरे वय 28 वर्ष, रा. खापरी असे मृतक महिलेचे नाव आहे. तीचे पती 9 वर्षोंपुर्वी मरण पावले असुन, अंश सचिन डाखरे हा मुलगा आहे. ते दोघे सरला श्रावण मडावी वय 65 वर्ष रा. ईस्तारी नगर खापरी यांचे घरी भांड्याने राहत होते. तसेच सदर महिला MECB कार्यालय मध्ये ठेकेदारी पध्तीने कामावर होती. ती 6 महीन्यापासुन घरीच होती. आज दिनांक 21/4/2025 रोजी सकाळी 9/00 वाजताचे सुमारास सदर महिलेचा घरातच मृतदेह आढळून आला. घरमालकीन सरला श्रावण मडावी वय 65 वर्ष रा. ईस्तारीनगर खापरी यांनी मृतक महिलेचे वडील हनुमान गोविंदराव बदकी वय 58 रा. वासरी यांना फोनकरुन माहीती दिली. त्यावरून मृतक महिलेचे वडील, बहिणी व जावयांनी घटनास्थळ गाठले. यावेळी मुलगी घरामध्ये गादीवर झोपलेल्या अवस्थेत मरण पावलेली दिसली. मृतक मुलगी प्रिती संचिन डाखरे वय 28 वर्ष हिने काल दिनांक 20/4/2025 रोजी सकाळी 9/00 ते 9/30 वा. सुमारास माझी तब्बयेत ठिक नसल्याने मी लग्नाला येवु शकत नाही असे सागितले होते. हनुमान बदकी यांनी घाटंजी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यावरून घाटंजी पोलिसांनी मर्ग नोंद केला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल खंडागळे करीत आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments