अन् पाळण्याच्या दोरीने गळफास घेवून विवाहीत युवकाची आत्महत्या


यवतमाळ : घरातील खोलीत पाळण्याच्या दोरीने गळफास घेवून विवाहित युवकाने आत्महत्या केली. ही घटना आज मंगळवारी १ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घाटंजी येथील गुरुदेव वार्ड नंबर ४ मध्ये उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

संदीप आडे वय 28 वर्ष रा. गुरुदेव वार्ड नंबर ४ घाटंजी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. गेल्या १५ दिवसापासून त्याची पत्नी मुलाबाळांना घेवून माहेरी गेली होती. दरम्यान ३१ मार्च रोजी रात्री कुटुंबातील सदस्य झोपल्या नंतर संदीप आडे हा आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता.  त्यानंतर त्याने पाळण्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. आज १ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास संदीपची आई झोपेतून उठली. यावेळी खोलीत पाहिले असता संदीपने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी घटनास्ळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालय पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर सामाजिक रीती रिवाजा प्रमाणे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, बहीण असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments