लग्नाचे आमिष दाखवुन अल्पवयीन मुलीला पळविले : तेलंगणा राज्यातून आरोपी जेरबंद

पुसद ग्रामिण पोलीस ठाण्याची ४८ तासात कारवाई

यवतमाळ : लग्नाचे आमिष दाखवुन अल्पवयरीन मुलीला पळवून नेल्याची घटना पुसद ग्रामिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी घडली होती. पोलिसांनी तपासचक्र फिरवून तेलंगणा राज्यातून आरोपीला जेरबंद करण्यात आले.

शेख अनवर शेख महेबुब वय ३४ वर्ष रा. मधुकर नगर, पुसद असे आरोपीचे नाव आहे. पोलीस ठाणे पुसद ग्रामीण येथे फिर्यादीने तक्रार दिली की, त्यांची अल्पवयीन नात हिस आरोपी नामे शेख अनवर शेख महेबुब वय ३४ वर्ष रा. मधुकर नगर, पुसद ता. पुसद याने लग्नाचे आमिष दाखवुन फुस लावुन पळवुन नेले. फिर्यादीच्या तक्रारीवरून दिनांक ०५/०४/२०२४ रोजी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे अपराध क्र. २१८/२०२५ कलम १३७ (२) बी.एन.एस अन्वये गुन्हां नोंद करण्यात आला. पुसद पोलिसांनी दिनांक ०६/०४/२०२५ रोजी सदर गुन्हयांतील आरोपी शेख अनवर शेख महेबुब वय ३४ वर्ष रा. मधुकर नगर पुसद हा पिडीता हिस घेवुन तेलंगणा राज्यातील हैद्राबाद परीसरात असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यावरुन  तेलंगणा राज्यात पोलीस पथक रवाना करून सदर गुन्हयातील आरोपी व पिडीत मुलीचा तेलंगणा राज्यातील हेद्राबाद तसेच आजुबाजुचे परीसरात शोध घेतला. तसेच सायबर सेल, यवतमाळ यांचेकडुन वेळोवेळी प्राप्त झालेल्या तांत्रीक माहितीच्या आधारे सदर गुन्हयांतील आरोपी शेख अनवर शेख महेबुब वय ३४ वर्ष रा. मधुकर नगर, पुसद व पिडीता यांना तेलंगणा राज्यातील हेद्राबाद परीसरातील भुवनगिरी येथुन रितसर ताब्यात घेण्यात आले. पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे आणुन अटक कार्यवाही करण्यात आली. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख जब्बार हे करीत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बि. जे. पुसद यांचे मार्गदर्शनाखाली, ठाणेदार स.पो.नि सुरेंद्र राउत, ठाणे पुसद ग्रामीण पुसद तसेच आरोपी शोध पथकातील स. फौ शेख मसुद, योगेश आळणे, शरद लेनगुरे, महीला सैनीक वनमाला सोळंके यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments