यवतमाळ
: सध्या मार्केटमध्ये विविध कंपन्याने चहाची पॉश दुकाने थाटली आहे. तरुणांन पासून
तर वयोवृद्धांना चहा पिण्याची सवय लागली आहे. त्यांची तलब भागविण्यासाठी गुळ,
साखर, काळा यासह विविध पद्धतीने चहा तयार केल्या जातो. चहा पिण्यासाठी प्रचंड
गर्दी या चहाच्या दुकानात पाहायला मिळते. अशाच प्रकारे एका चहा कॅन्टींगवर एक तरुण
चहा पित होता. यावेळी मित्र असलेल्या युवकाने चहा का पाजत नाही म्हणून वाद करुन
चाकुने हल्ला चढविला. या हल्ल्यात युवक जखमी झाला. ही घटना उमरखेड शहरातील हदगाव
रोडवरील गुळाचा चहा कॅन्टींगवर शुक्रवारी २५ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजताच्या
सुमारास घडली.
संतोष उर्फ आलोक दत्ता राऊत रा भगतसिंग वार्ड वय 22 वर्षे असे जखमी युवकाचे नाव आहे. तर तुषार संतोष कळसे
वय 22 वर्षे रा. लोहार गल्ली उमरखेड असे आरोपीचे नाव आहे. दि. 25 एप्रील रोजी दुपारी 4
:30 वाजता उमरखेड शहरातील हदगाव रोडवरील गुळाचा चहा
कॅन्टींगवर संतोष उर्फ आलोक हा चहा पीत होता. त्या ठिकाणी आरोपी तुषार कळसे हा तेथे आला. ‘तू मला चहा का पाजत नाही’ म्हणून वाद निर्माण केला. त्याच्या हातातील चाकूने पोटावर
वार करून जखमी करुन जीवाने मारून टाकण्याची धमकी
दिली. या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
केला असून, पुढील तपास सुरु आहे.
0 Comments