यवतमाळ : हैद्राबाद विरुध्द पंजाब या क्रिकेट मॅचवर सुरु असलेला आयपीएल सट्ट्यावर एलसीबीच्या पथकाने धाड टाकली. यामध्ये चार आरोपींवर कारवाई केली. त्यांच्याकडून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. ही कारवाई कान्होबा टेकडी परिसर घाटंजी येथे करण्यात आली.
प्रतिक किरण द्रोणा, वय २७ वर्ष, रा. अंबादेवी वार्ड घाटंजी, शुभम शाम खांडरे, वय २६ वर्ष, रा. राम मंदीर वार्ड घाटंजी, कार्तिक गणेश धांदे, वय २१ वर्ष, रा. राम मंदीर वार्ड घाटंजी, प्रथमेश दिलीप घुधाने, वय २३ वर्ष, रा. महात्मा गांधी वार्ड घाटंजी अशी आरोपींची नावे आहे. दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पांढरकवडा विभागामध्ये उघडकीस न आलेले गुन्हे, अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन घाटंजी पसिरात पेट्रोलींग करीत होते. अशातच कान्होबा टेकडी परिसरातील खुल्या जागेत काही ईसम सुरु असलेल्या IPL T-20 क्रिकेट सामान्याचे दिनांक १२ एप्रिल रोजी असणाऱ्या हैद्राबाद विरुध्द पंजाब या क्रिकेट मॅचवर मोबाईल फोन चे साहयाने लोकांकडुन पैसे घेवुन पैशांची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळ खेळवित आहे. अशी गोपणीय खबर प्राप्त झाल्याने खबरेचे गांभीर्य लक्षात घेवुन स्थागुशा कडील पथकाने तात्काळ पंचासह घटनास्थळी धाड टाकली. यावेळी क्रिकेट सट्टा घेणारे प्रतिक किरण द्रोणा, वय २७ वर्ष, रा. अंबादेवी वार्ड घाटंजी, शुभम शाम खांडरे, वय २६ वर्ष, रा. राम मंदीर वार्ड घाटंजी, कार्तिक गणेश धांदे, वय २१ वर्ष, रा. राम मंदीर वार्ड घाटंजी, प्रथमेश दिलीप घुधाने, वय २३ वर्ष, रा. महात्मा गांधी वार्ड घाटंजी हे मोक्यावर मिळून आले. घटनास्थळावर मिळुन आलेले ४ अॅण्ड्रॉईड मोबाईल, २ मोटार सायकल, व नगदी असा एकुण १,७१,४००/- रुपयांचा मुददेमाल जप्त करुन आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन घाटंजी येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी व मुददेमाल पुढील कार्यवाही कामी पोलीस स्टेशनचे ताब्यात दिला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, सतिश चवरे, पोलीस निरीक्षक स्था. गु.षशा. यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि अजयकुमार वाढवे, पोउपनि धनराज हाके, पोलीस अंमलदार सुधीर पांडे, उल्हास कुमरकुटे, सुनिल खंडागळे, सुधीर पिदुरकर, रजनिकांत महाबो, सलमान शेख, नरेश राऊत, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी केली.
0 Comments