जन्मभूमीला पुरस्कार समर्पित

शिक्षिकेच्या हस्ते सन्मान : भिम जयंती उत्सव समितीचे जाहिर आभार 

यवतमाळ : जिल्ह्य़ातील  नेर तालुक्यातील चिकणी डोमगा हे छोटस गाव. या गावातील जिल्हा परिषद शाळेत सातव्या वर्गापर्यंत शिक्षण घेतले. घरची परिस्थीती जमतेम असल्याने शिक्षण घेण्यासह कुटुंबाला हातभार लागावा म्हणून माझी जन्मभूमी चिकणी डोमगा या गावातूनच पत्रकारितेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर  नेर येथे तालुक्याच्या ठिकाणी व नंतर यवतमाळ  सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी  पत्रकारितेला सुरुवात केली. पहाता पाहता 25 वर्षाच्यावर पत्रकारितेचे व्रत सुरुच आहे. अचानक सात आठ दिवसापूर्वीच गावातील वर्ग मित्राचा फोन आला. गावात (चिकणी डोमगा) चार दिवस भिम जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये माझाही पत्रकार क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मान करणार असल्याचे सांगितले होते.  दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी अर्थात क्रांतिसुर्य महात्मा  ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी सन्मान करण्यात आला. आमच्या शिक्षिका शशिकला डोंगरे, कमलाबाई खोब्रागडे यांच्या हस्ते पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आले. तसेच काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी गृह मंत्री माणिकरावजी ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आले.  माझ्यासाठी हा पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार आहे. ज्या गावापासून पत्रकारितेची सुरुवात केली. त्या जन्मभूमी चिकणी डोमगा या गावातच माझा सत्कार, सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार जन्मभूमीला समर्पित करतो. 

भिम जयंती महोत्सव आयोजन समितीने माझा सन्मान केला. तो सन्मान मी स्वीकार करतो. आयोजन समितीचे मनपूर्वक धन्यवाद !  व जाहिर आभार 

आपला 

राहुल शांताबाई होमराव वासनिक 
मो. 9890875261
दैनिक विदर्भ कल्याण, जिल्हा प्रतिनिधी
पोलीस टाईम्स, रिपोर्टर 
तहलका टाईम, संपादक






Post a Comment

0 Comments