पांढरकवडा : केळापूर तालुक्यातील आकोली खु. येथील शेतकरी प्रयागराव दत्तात्रय डंभारे यांचे शेत गट नं २०/१ या शेतातील गोठ्याला दि ०६ एप्रिल २०२५ रविवारला सकाळी ११:०० वाजता दरम्यान आग लागली असुन यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात स्पिंक्रलर पाईप ११० नग , स्पिंक्रलर नोझल २५ नग, स्प्रे पंप ०२ नग, गहू २२ क्विंटल, लाकुड फाटा १० नग, टिन पत्रे ७० या वस्तू जळुन खाक झाले आहे. याची माहिती मिळताच तलाठी पी व्ही रुईकर व कोतवाल शुभम पाटील यांनी पाहणी केली व या बाबतीतचा अहवाल तहसीलदार राजेंद्र इंगळे यांना दिली असून अधिक तपास करीत आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments