यवतमाळ : लोहारा एमआयडीसी परिसरात असलेल्या मनोरमा दालमिलमध्ये स्टोरेज पडलयाने खाली दबुन तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. तर दोन कामगाराचा मृत्यू झाला होता. लोहारा पोलिसांसह कामगार अधिकारी, इंडस्टिज डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टरने घटनास्थळी व्हिजीट देवून पाहणी केली होती. त्या ठिकाणी काम कर-या अन्य कामगारांचे बयाण नोदविले होते. त्यानंतर अखेर आज दालमिल मालकासह व्यवस्थापक, कॉन्ट्रॅक्टर यांच्या विरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राखी सुनिलकुमार गुगलीया वय 45 वर्ष (प्रोप्रायटर, मनोरमा दाल मील), संजय पारसमल गुगलीया वय 54 वर्ष (व्यवस्थापक मनोरमा दाल मील) दोन्ही रा. वाघापुर रोड यवतमाळ, मुकुंद केशरी रा. जबलपुर (कॉन्ट्रॅक्टर ओम इंजिनीअरींग फर्म) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. दि. 15 एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मनोरमा तुर दालमिलमध्ये तुर दाल कंटेनर मजुरांचे अंगावर पडुन अपघात झाला. यावेळी लोहारा पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता, 100 क्विंटन क्षमता असलेली लोखंडी हौदी ही खाली पडल्याचे निदर्शनास आले. यावेळी तुर दालमिलचे डायरेक्टर संजय जैन हे तेथे हजर होते. पोलिसांनी घटनेसंबंधाने विचारपुस केली असता, त्यांनी सांगितले की, दिनांक 15 एप्रिल रोजी 8-9 मजुर व एक सुपरवायझर काम करीत होते. तुर दाल हौदीच्या खालीच पॅकींगचे काम चालु होते. सदर ठिकाणी भावेश विजय कडवे वय 2.3 वर्ष रा. वर्धा, सुजर सुंदरलाल काजले वय 20 वर्ष रा. मध्यप्रदेश, मुकेश शंकरलाल काजले वय 30 वर्ष रा.मध्यप्रदेश, दिलीप रामप्रसाद मावसकर वय 27 वर्ष रा. मध्यप्रदेश, करण बाबुलाल धुर्वे वय 20 वर्ष रा. मध्यप्रदेश हे लोखंडी हौदीच्या खाली तुरदाळीचे पोते शिलाई मशीन वर काम करत होते. अचानक दालहौदी खाली पडुन त्याखाली दबुन भावेश विजय कडवे, सुजर सुंदरलाल काजले, मुकेश शंकरलाल काजले जागीच मरण पावले. तर दिलीप रामप्रसाद मावसकर, करण बाबुलाल धुर्वे हे दोन मजुर जखमी झाले होते.
२०० क्विंटल क्षमतेची टाकी
तुर दाल मीलचे समोरील शेटर पासुन 17 फुट अंतरावर एक लोखंडी हौदी ज्याची 200 क्विंटन क्षमता असलेली तुरदाळीची हौदी (टाकी) खाली जमिनीवर कोसळलेली. सदर हौदीच्या बाजुला 4 लोखंडी पिलर ला हौदी जमीनीपासुन 18 फुट अंतरावर वेल्डींगने जोडलेले असल्याचे समोर आले.
वेल्टींग तुटल्याने घडली दुर्घटना
सदरची वेल्डींग अर्ध्यातुन तुटुन हौदी खाली पडुन त्याखाली तुर दाल पॅकींगचे काम करणारे वरील तिन लोकांचा जागीच मृत्यु झाला. तर दोन कामगार जखमी झाले. त्यामुळे तात्काळ सदर तीन मयत ईसमांना मरच्युरी व जखमी यांना शासकीय रुग्नालय येथे उपचाराकरीता पाठविण्यात आले. घटनास्थळ पंचानामा करण्यात आला.
प्रथम मर्ग दाखल
दि. 15/04/2025 च्या संध्याकाळी D.D प्राप्त झाल्याने मर्ग क्रमांक 13/2025 भावेश कडवे, 14/2025 सुजर सुंदरलाल काजले, 15/2025 मुकेश शंकरलाल काजले यांचा 194 BNSS अन्वये मर्ग दाखल करण्यात आले. दि.16 एप्रिल रोजी / तिन्ही मयत इसमांचे P.M. करुन प्रेत संबंधीत नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले.
व्यवस्थापनाने घेतला तीन कामगारांचा बळी
मनोरमा दाल मील MIDC लोहारा, यवतमाळचे प्रोप्रायटर राखी सुनिलकुमार गुगलीया वय 45 वर्ष व व्यवस्थापक, संजय पारसमल गुगलीया वय 54 वर्ष दोन्ही रा. वाघापुर रोड यवतमाळ व सदर लोखंडी हौदीचे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर मुकुंद केशरी ओम इंजिनीअरींग फर्म यांच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे तीन कामगारांचा मृत्यूस व दोन कामगार जखमी होण्यास कारणीभुत ठरली. त्यामुळे लोहारा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अतुल चौहाण यांच्या तक्रारीवरुन लोहारा पोलिसांनी कलम 106,125(ब),3(5) BNS अन्वये गुन्हा नोंद केला. लेखी रिपोर्ट व मर्ग क्र 13/2025,14/2025,15/2025 कलम 194 BNSS व इंज्युरी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला आहे.
0 Comments