यवतमाळ : कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलेल्या तलाठ्याचे घर फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा लाखोचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना आज रविवारी सकाळी घाटंजी येथील पॉम्पटटी ले आउट मध्ये घडली.
राजु खुशाल मानकर वय 38 वर्षे रा. पॉम्पटटी ले आउट घाटंजी असे फिर्यादीचे नाव आहे. ते घाटंजी तहसीलमध्ये तलाठी या पदावर कार्यरत आहे. येवती ता. जि. यवतमाळ येथे घरगुती कार्यक्रम असल्याने दोन दिवसा अगोदर पत्नी व दोन्ही मुले गेले होते. 19 एप्रिल रोजी तलाठी मानकर हे येवती येथे गेले होते. दरम्यान आज दि. 20/04/2025 रोजी सकाळी 11/00 वा. शेजारी राहणारे अतुल भोयर यांनी फोन करून तुमच्या घरा बाहेरवा दाराची लॉक लावलेली कडी तुटुन दिसत असल्याची माहिती दिली. त्यामुळे तलाठ्याने परत येऊन घरात पाहणी केली. बेडरुम मध्ये गेलो असता माझे बेडरूम मध्ये ठेवुन असलेली लोखंडी अलमारीचे दोन्ही कपाट तोडुन त्यातील ठेवलेले कपडे व ईतर साहित्य अस्तव्यस्त करून फेक फाक केलेले होते. तसेच त्यामधील छोटे छोटे दोन्ही लॉकर तोडुन सोने व रोख रक्कम असा तीन लाख बत्तीस हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास समोर आले. या घटनेची तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
0 Comments