यवतमाळ : एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
आढळुन आला होता. त्या पाठोपाठ एका युवकाचा सागाळा आढळला होता. त्या दोघांची ओळख
पटवून घटनेचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसा समोर उभे ठाकले होते. या प्रकरणाच्या
तपासाठी सहा पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान आज त्या दोन्ही मृतकांची
ओळख पटली आहे. यातील महिला विवाहीत असून, पुरुष हा अविवाहीत आहे. त्या दोघांचे सुत
जुळल्याने पळून गेले होते. अखेर दिग्रस तालुक्यातील क्षेत्रातील दत्तापुर
जवळील कोलुरा जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला होता. प्रेम प्रकरणातून
त्याची हत्या झाली असून, आरोपी पोलिसांच्या टप्प्यात असल्याची माहिती सुत्रांनी ‘तहलका
टाईम’ला दिली.
वर्षा धनराज गिरे वय २८ वर्ष रा. उमरी बु. ता.
मानोरा जि. वाशिम, आकाश विलास बल्हाळ वय २६ रा. वाई गोस्था ता. मानोरा जि. वाशिम
अशी मृतकांची नावे आहे. वर्षा हीचा धनराज गिरे याचा सोबत विवाह झाला होता. वर्षा व
आकाश हे उस तोडणीचे काम करण्यासाठी जात होते. त्या ठिकाणी त्या दोघांचे सुत जुळून
एकमेकांच्या प्रेमात पडले. २९ मार्च रोजी ते दोघे घरुन पळून गेले होते. दरम्यान ७
एप्रिल रोजी दिग्रस वनविभाग क्षेत्रातील दत्तापुर जवळील कोलुरा जंगलात
७ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजताच्या महिलेचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
होता. त्या पाठोपाठ ८ एप्रिल रोजी युवकाचाही मृतदेह आढळला होता. दोन्ही मृतदेह
कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यांची ओळख पटविण्याचे अव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले
होते. या प्रकरणाच्या तपासासाठी दिग्रस पोलीस ठाण्यासह व स्थानिक गुन्हे शाखेचे
पाच पथक तयार करण्यात आले होते. अखेर आज गुरुवार दिनांक १० एप्रिल रोजी त्या
दोघांची ओळख पटली. प्रेम प्रकरणातून त्या दोघांची हत्या झाल्याचे पोलीस तपासात
समोर आल्याची माहिती सुत्रांनी ‘तहलका टाईम’ला दिली. दोन्ही मृतकाच्या कुटुंबातील
सदस्य च नातेवाईकांची कसुन चौकशी सुरु असून, आरोपी पोलिसांच्या टप्प्यात आहे. पोलिसांनी
दोन दिवस तपासचक्रे फिरवून या किलीष्ट प्रकरणाचा उलगडा केला.
0 Comments