ब्रकींग : पोलिसांचे सहा पथक तयार : ‘त्या’ दोन कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यावर ‘फोकस’



यवतमाळ : दिग्रस पासून दोन किलोमीटर अंतरावरील तालुक्यातील दत्तापुर जवळील कोलुरा ते फेट्री मार्गावरील दिग्रस वनविभाग बिट क्रमांक ८०२ क्षेत्रांतील जंगलात एक महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना ७ एप्रिल २०२५ रात्री ६ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. दरम्यान आज ८ एप्रिल रोजी महिलेच्या मृत्यदेहा पासून १०० मीटर अंतरावर एका इसमाचा मृतदेह आढळला. एकापाठोपाठ दोन मृतदेह आढळल्याने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. महिला व इसमाची अजूनही ओळख पटली नाही. त्यामुळे पोलिसांनी तपासासाठी सहा पथकाची निर्मिती केली असून, मृतदेहाची ओळख पटविण्यावर फोकस असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांनी ‘तहलका टाईम’शी बोलतांना दिली.

दिग्रस वनविभाग क्षेत्रातील दत्तापुर जवळील कोलुरा जंगलात काल एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान एका महिलेचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. तेव्हा दिग्रस पोलिसांनी घटनास्थळी पोहचून त्या मृतक मृतदेहाची पाहणी केली. मृतक अनोळखी महिला मृतदेहाचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्ष, उंची अंदाजे ५ फूट, चेहरा गोल, केस काळे, अंगात निळसर आकाशी रंगाची साडी, निळा ब्लाऊज यावर पांढऱ्या रंगाचे फुलाचे डिझाईन असलेले, दोन्ही हातात निळ्या रंगाच्या बांगड्या, सदर प्रेत कुजलेल्या अवस्थेत आहे. सद्यस्थितीत मृत महिलेची ओळख पटलेली नाही.

दरम्यान ८ एप्रिल रोजीला सकाळी अंदाजे ६ वाजतच्या सुमारास सदर महिलेचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला त्या ठिकापासून १०० मिटर अंतरावर एका इसमाचा सांगाडा आढळून आला. सदर इसमाची सुद्धा ओळख पटली नाही. सदर महिलेस किंवा पुरुषास कोणी ओळखत असल्यास पोलीस स्टेशन दिग्रस येथे कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मृतक पुरुष यांचा डोक्यापासून तर कमरेपर्यंत हाडाचा सांगडा व हातात चांदीचे गोल कडे, पायात मोजे असे वनविभाग क्षेत्रांतील कोलूरा जंगलात २ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले. यावरून पोलीस ओळख पटविण्याचे कार्य करीत आहे. या तपासासाठी विविध तांत्रिक बाबी मिसिंग रिपोर्ट, डिबी स्कॉड, एलसीबी पथक, फॉरेन्सिक टीम तपास करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला आहे. वृत्त लिहिस्तोर मृतदेहाचे जागीच शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया वैद्यकीय टीमच्या वतीने सुरू होती. या घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत यांनी भेट दिली आहे.

मृतकांची ओळख पटविण्यावर ‘फोकस’

महिला व इसमाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. ओळख पटल्यानंतर या गुन्ह्याचा उलगडा होण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वप्रथम मृतदेहाची ओळख पटविण्यावर पोलिसांनी फोकस केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सहा पोलीस पथकाची निर्मिती केली आहे. यवतमाळ जिल्ह्यालगत असलेल्या अन्य जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात संपर्क साधला असून, तपास सुरु असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक पियूष जगताप यांनी ‘तहलका टाईम’शी बोलतांना दिली.

 

Post a Comment

0 Comments