आमदार भावना गवळी यांच्या पाठपुराव्याला यश
यवतमाळ : यवतमाळ नगर परिषद हद्दीतील थकीत मालमत्ता करावरील व्याज आकारणी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
यवतमाळ नगर परिषद हद्दीमधील थकीत मालमत्ता करावर दोन टक्के प्रति महिना याप्रमाणे व्याज आकारले जात होते. म्हणजेच वर्षाला 24 टक्के व्याज आकारले जात होते. या संदर्भात शहरातील अनेक मालमत्ता धारकांनी या तुघलकी व्याज आकारणी बाबत शिवसेनेचे शहर प्रमुख पिंटु बांगर यांची भेट घेऊन त्यांना हा विषय सांगीतला होता. पिंटु बांगर यांनी आमदार भावनाताई गवळी यांना सदर विषय सांगीतल्यानंतर भावनाताई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचेकडे ही व्याज आकारणी रद्द करण्याची मागणी केली. आता मात्र महायुती सरकारने ही व्याज आकारणी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर विकास मंत्रालयाने या मागणीची दखल घेतल्यामुळे शहर वासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनेक नगर परिषद व नगर पंचायतने आपल्या हद्दीतील थकीत मालमत्ता करावर व्याज आकारणी करण्याचा तुघलकी निणय घेतला होता. मालमत्ता धारकांना तशा संदर्भातील नोटीस देखील जारी करण्यात आल्या होत्या. व्याज आकारणी शहर वासीयांना नाहक भुर्दंड देणारी बाब होती. आता मात्र या निर्णयामुळे संपुर्ण राज्यातील नगर परिषद तसेच नगर पंचायत भागातील नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा
थकीत मालमत्ता करावरील व्याज आकारणी रद्द करण्याची मागणी मी आमदार भावनाताई गवळी यांचेकडे केली होती. महायुती सरकारने नगर परिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता करा वरील व्याज माफ करून मूळ रक्कम वसुलीसाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने आता ही मागणी मान्य केल्यामुळे आमदार भावनाताई गवळी तसेच महायुती सरकारचे मी स्वागत करतो तसेच नागरीकांनी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पिंटु बांगर शिवसेना शहर प्रमुख, यवतमाळ यांनी केले.
0 Comments